शौचालयाचा वापर केल्यावर टॉयलेट पेपर वापरावा की, पाणी यावर बरीच चर्चा होते. शौचालयाचा वापर सगळेचजण करतात. रोजच्या आयुष्याचा तो एक भाग आहे. वैयक्तिक स्वच्छता सर्वात जास्त महत्वाची असते. एका संशोधनानुसार टॉयलेट पेपर वापरण्यापेक्षा भारतीय पद्धती प्रमाणे पाणी वापरणं जास्त चांगलं असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासंदर्भात ऑथर रोज जॉर्ज यांनी लिहिलेल्या बिग नेसेसिटी: द अनमेन्सनेबल वर्ल्ड ऑफ ह्यूमन वेस्ट अॅन्ड व्हाईट इट मॅटर्समध्ये (Big Necessity: The Unmentionable World of Human Waste and Why It Matters) देण्यात आलेल्या माहितीनुसार टॉयलेट पेपर वापरणारे लोक आपल्यासोबत घाण घेऊन फिरत असल्याचा भास होतो असं लिहिण्यात आलं आहे.