

घामामुळे शरीरातून दुर्गंध येणं अपेक्षित आहे, पण असे सतत होत असेल तर तुम्हाला आणि इतरांना त्रासदायी ठरू शकतं. शरीरामध्ये घामाचं प्रमाण वाढलं की, दुर्गंधीचं प्रमाण वाढतं. अशा परिस्थितीत दिवसांतून दोनदा आंघोळ करणं गरजेचं आहे. तसेच लिंबू आणि सोड्याचे मिश्रण काखेत लावल्याने शरीरातून दुर्गंधी येत नाही. याशिवायही अनेक घरगुती प्रकारातून घामामुळे शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करू शकता.


शरीरात हिट जास्त झाली की मोठ्या प्रमाणात घाम येतो. यासाठी बेकिंग सोडा आणि मक्याचं पीठ योग्य प्रमाणात मिसळून घ्या. हे मिश्रण काखेत लावा, यामुळे घामातून दुर्गंध येणं कमी होईल.


आहारात जास्त तिखट, मसालेदार पदार्थ आणि कॅफिन असलेले पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीला घाम जास्त येतो. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करावे. (कॅफिन म्हणजे द्रव्य असलेले पदार्थ उदा. कॉफी)


हात स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे सॅनिटायझरच्या मदतीनेसुद्धा घाम येण्यावर तोडगा काढू शकता. सॅनिटायझर काखेत वापरल्याने घामाचा वास कमी होतो.


आंघोळ करताना पाण्यामध्ये लिंबाचे दोन थेंब टाकून मग आघोळ करावी. लिंबू हा एक नैसर्गिक परफ्युम आहे, त्यामुळे हा प्रकार तुमची घामाच्या दुर्गंधापासून सुटका करू शकतो.