

कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर तुमच्या नात्यात गैरसमजाची भिंत उभी राहिली. तर मग त्या नात्यात खटके उडायला सुरुवात होते आणि व्यक्ती एकमेकांवर संशय घ्यायला सुरुवात करतात.


तुमच्या आयुष्यातही अशा समस्या सुरु असतील किंवा तुमचा पार्टनर सतत तुमच्यावर संशय घेत असेल तर जाणून घ्या कशाप्रकारे तुमच्या पार्टनरची समजूत घालून त्यातील विश्वास टिकवता येईल.


जर तुमच्या पार्टनरचा स्वभाव संशयी असेल तर अशावेळी त्याचं संशय घेणं कधीच गंमतीवर घेऊ नका अन्याथा यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यापेक्षा त्याची प्रेमानं समजूत काढा.


ऑफिसमधून उशीरा येणं, पार्टनरला पार्टीमध्ये घेऊन न जाणं किंवा फोनवर गुपचूप बोलणं या गोष्टींमुळे व्यक्तीच्या मनात संशय उत्पन्न होतो. जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर मग अशा गोष्टी करणं शक्यतो टाळा.


जर तुमचा पार्टनर तुम्हाला विनाकारण कोणतेही प्रश्न विचारत असेल. ज्याची काहीही गरज नसते. तर अशा प्रश्नांची उत्तर द्या ज्यामुळे त्याचं मन शांत राहील. त्यानंतर त्याचा चुका त्याच्या निदर्शनास आणून द्या.