तुम्हाला माहितीये? या वस्तू केवळ राईट हॅन्डेड लोकांच्या सोयीनेच बनतात, लेफ्टींना हाताळताना होतो त्रास
उजव्या हाताने काम करणारी बहुसंख्य लोकं असतात. मात्र काही लोक डाव्या हाताने काम करतात. म्हणजेच ते लेफ्टी असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? अशा अनेक वस्तू आहेत ज्या लेफ्टी असलेल्या लोकांना वापरणे थोडे कठीण जाते.
रोजच्या वापरातल्या काही वस्तू हाताळणे डावखुऱ्या लोकांना थोडे कठीण जाऊ शकते. जसे की रोजचे वही पेन. वहीवर लिहिणे उजव्या हाताच्या लोकांसाठी सोपे असते. मात्र डावखुऱ्या लोकांना ते सुरुवातीला थोडे कठीण जाऊ शकते.
2/ 6
क्रेडिट कार्ड स्वाइप : क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी उजव्या हाताचा वापर केला जातो, कारण तो उजव्या बाजूला असतो. त्यामुळे डाव्या हाताने स्वाईप करणे थोडे कठीण जाते.
3/ 6
बटाटे सोलणारे यंत्र : भाजीची साल फक्त उजव्या हाताच्या लोकांसाठी बनवली जाते. त्यामुळे डावखुऱ्या लोकांसाठी ते थोडे त्रासदायक असते.
4/ 6
गिटार : जर आपण गिटारबद्दल बोललो तर त्याच्या तार देखील उजव्या हाताच्या लोकांना लक्षात घेऊन डिझाइन केल्या असतात. डावखुऱ्या लोकांना ते वापरणे कठीण जाते.
5/ 6
कात्री : कात्री बनवलेलीच अशी असते की, ती डाव्या हाताच्या लोकांना चालवताना त्रास होतो. मात्र सरावाने या सर्व वस्तू हाताळणे लेफ्टी लोकांनाही सोपे जाते.
6/ 6
संगणक कीबोर्ड : त्याची रचना देखील अशा प्रकारे बनविली जाते की डाव्या हाताच्या लोकांना समस्या येतात.