झगमगत्या पडद्यावरच्या तारे-तारकांना पाहून आपल्याला त्यांच्या आयुष्याचा हेवा वाटतो. पण अनेकजण विविध शारिरिरक समस्यांशी लढा देत आहेत. अनुष्का शर्मा बल्जिंग डिस्कनं अस्वस्थ असते. यात पाठीच्या मणक्यांपासून सुरवात होत सगळ्या हाडांमध्ये खूप वेदना होतात.
2/ 6
अजय देवगन या सुपरहीरोला टेनिस एल्बोचा त्रास आहे. अनेकदा वेदनेमुळे त्याला हात उचलताही येत नाही.
3/ 6
काजल राघवानी या भोजपुरी अभिनेत्रीला पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. यात शरीरामध्ये हार्मोन्सचं असंतुलन निर्माण होतं.
4/ 6
हिट अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तर ५ वर्षांची असल्यापासूनच अस्थमा अर्थात दम्याची पेशंट आहे. यात श्वास घ्यायला त्रास होतो.
5/ 6
पडद्यावर ही मॅन असलेले सनी देओल प्रत्यक्ष आयुष्यात कंबरेच्या तीव्र दुखण्याशी लढत असतात. फिजीओथेरपी आणि योगाच्या माध्यमातून ते यावर नियंत्रण ठेवतात.
6/ 6
ताकदीच्या स्त्रीभूमिकांसाठी ओळखली जाणारी विद्या बालन ओसीडी अर्थात ऑब्सेसिव कंपल्सिव डिसॉर्डरनं ग्रस्त आहे. यात कुठल्यातरी गोष्टीकडे सतत तुमचं मन तुम्हाला खेचत राहतं.