हालचालींचा अभाव जे लोक दिवसभर केवळ बसून राहतात कोणतीही हालचाल करत नाहीत. त्यांना हाडांचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. खरंतर आपले स्नायू आणि हाडं मजबूत राहण्यासाठी वर्कआऊट करणं गरजेचे आहे. त्यामुळे घरातच राहणाऱ्या लोकांनी सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, वॉकिंग, व्यायाम, योगा करावा. त्यामुळे हाडं मजबूत राहतील.
मिठाचं जास्त प्रमाण जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असेल, दिवसभरामध्ये जास्त मीठ खात असाल तर, त्याने देखील हाडांना धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते मिठामध्ये सोडियम असतं. जास्त प्रमाणामध्ये सोडियम शरीरात गेल्यामुळे बोन डेन्सिटी कमी होऊ लागते. आपल्या आहारामध्ये दिवसभरात केवळ 150 मिलीग्रॅम मीठ असायला हवं.
उन्हात जाण्यास टाळाटाळ दिवसभर घरामध्ये राहिल्यामुळे हाडांची मजबुती कमी होते. उन्हात गेल्याने व्हिटॅमीन डी मिळतं. विटामिन डीमुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण वाढतं. त्यामुळे सकाळच्यावेळी घरांमधून बाहेर पडा. सकाळच्या कोवळ्या ऊन्हाने शरीराला व्हिटॅमीन डी मिळेल. याशिवाय विटामिन डीच्या सप्लिमेंट देखील घेऊ शकता.