

अनेकदा जेवताना घरातले ठराविक पदार्थांवर दुसरा पदार्थ खाऊ देत नाहीत. या मागचं कारण विचारलं तर पोटासाठी ते योग्य नसल्याचं उत्तर मिळतं. नेमकी असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाल्यास पोटाचे विकार होऊ शकतात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ज्यांना कच्ची फळं खायला फारशी आवडत नाहीत ते फळांचा रस प्यायला प्राधान्य देतात. पण कच्ची फळं खाण्याचे फायदे अधिक असतात. सर्दी, तापाच्यावेळी ताजी फळं खाल्ली तर त्यातून जास्तप्रमाणात विटामिन आणि पोषक तत्व मिळतात.


तुम्ही फळांचा रस जरी घेत असाल तरी तो शक्यतो घरात तयार केलेला असेल तोच घ्या. याशिवाय तिखट आणि चमचमीत पदार्थांसोबत फळांचा रस पिणं टाळा. यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात.


असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. वात, पित्त, कफसारखे विकार वाढतात. यामुळे गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास होतो.


अती थंड आणि अती गरम पदार्थ एकत्र शिजवू नयेत. तसेच जेवताना ज्यात साखर असेल असे फळांचे रस पिऊ नयेत.