Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 6


सध्या परीक्षांचा काळ आहे. लवकरच 10वी,12वी परीक्षा सुरू होतील. सगळे जण अभ्यासाला लागलेत. परीक्षेच्या काळात तणाव कमी करण्यासाठी आहारात ठराविक पदार्थ ठेवलेत तर नक्कीच फायदा होईल.
2/ 6


नाशपती फळ हे बहुपयोगी आहे. त्यात व्हिटॅमिन सी, मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडेंट असतं. त्यामुळे पेशींना आराम मिळतो. त्यानं तणाव दूर होतो.
3/ 6


चेरी हे गोड फळ आहे. त्यानं झोप चांगली येते. हीलिंग फूड्स या पुस्तकानुसार चेरीत मेलाटोनिन (melatonin) जास्त असतं. त्यानं झोप येऊन तणाव दूर होतो.
4/ 6


गोजीबेरी किंवा वुल्फबेरी नावाचं फळ बाजारात मिळतं. हे चायनीज फळ आहे. त्यात कोलीन असतं. तणाव दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
5/ 6


दुधात व्हिटॅमिन B 12 असतं. मेंदूसाठी ते उपयुक्त आहे. एनर्जीही वाढते. परीक्षेच्या काळात पचत असेल तर नियमित दूध घ्या. दूध पचत नसेल तर दही खायला हरकत नाही.