

तुम्ही आतापर्यंत अनेकदा हॉटेलमध्ये राहिला असाल. पण जर तुम्हाला नदीत तरंगणाऱ्या हॉटेलमध्ये राहायची संधी मिळाली तर कसं वाटेल... लोकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वीडनमधील लॅपलँड येथे द आर्कटिक बाथ हे नवं हॉटेल आणि स्पा तयार केलं जात आहे.


ल्यूल नदीवर तयार होणाऱ्या या हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेकजण आतापासूनच उत्सुक आहेत. या हॉटेलची लोकांमध्ये एवढी क्रेझ आहे की 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचं बुकिंगही सुरू झालं आहे.


ल्यूल नदीवर तयार होणाऱ्या द आर्कटिक बाथ या हॉटेल आणि स्पामध्ये एक दिवस राहण्यासाठी जवळपास 815 पाउंड मोजावे लागणार आहे. भारतीय रुपयांमध्ये एका दिवसाची हॉटेलमध्ये राहण्याची किंमत जवळपास 75 हजार रुपये आहे.


या हॉटेलची विशेष गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात हे हॉटेल नदीवर तरंगताना दिसेल तर थंडीत बर्फामुळे नदीवर एकाच जागी खिळून राहील. ल्यूल नदी थंडीत गोठते त्यामुळे यावर तरंगणारं हॉटेलही गोठून एका जागी स्थिर होईल.


या हॉटेलमध्ये असणारं स्पा सेन्टर, वेलनेस थीमवर आधारित आहे. इथे ग्राहकांना न्यूट्रिशन, व्यायाम आणि मनः शांतीसाठी विशेष थेरपी दिली जाणार.