आता TATA करणार Covid test; फक्त 75 मिनिटांत अचूक निदान करण्याचा दावा
आता कोरोना टेस्टनंतर (corona tets) रिपोर्टसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कमीत कमी वेळेत रिझल्ट देणारी मेड इन इंडिया कोरोना टेस्ट लाँच करण्यात आली आहे.
|
1/ 5
सध्या कोरोनाव्हारसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) केली जात आहे. त्याचा रिझल्ट यायला वेळ लागतो. मात्र आता कोरोनाची अशी मेड इन इंडिया टेस्ट विकसित करण्यात आली आहे ती एका तासाच्या आतच रिझल्ट देणार आहे.
2/ 5
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), इन्स्टिट्युट ऑफ जिनोमॅटिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजीच्या (IGIB) संशोधकांनी ही टेस्ट तयार केली आहे. टाटा मेडिकल अँड डायगोन्सिटक्स लिमिडेटने (TataMD) ही टेस्ट किट लाँच केली आहे.
3/ 5
TataMD CHECK ही CRISPR Cas-9 टेक्नॉलॉजीवर आधारित एक कोरोना पेपर टेस्ट (Paper Test) आहे. ज्यामुळे फक्त 75 मिनिटांतच कोरोनाचं निदान करता येऊ शकतं, असा दावा कंपनीनं केला आहे.
4/ 5
इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि ड्रग्ज कंट्रोलकर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) या टेस्टला किटला मान्यता दिली आहे. ही टेस्ट करायला मान्यता दिली आहे. आता काही आठवड्यात भारतातील डायग्नोस्टिक सेंटर आणि रुग्णालयात ही टेस्ट उपलब्ध होणार आहे.
5/ 5
पारंपरिक आरटी-पीसीआर टेस्ट इतका अचूक निकाल TataMD CHECK टेस्ट देत असल्याचा दावा याआधी कंपनीनं केला होता. या टेस्टने दिलेल्या निकालांपैकी 96 टक्के निकाल अचूक आल्याचं याआधी सांगण्यात आलं आहे.