सणांसाठी बदलताय मासिक पाळीचं चक्र; पीरियड पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं किती योग्य?
आता दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीचा आनंद लुटता यावा, मजा करता यावी. अगदी त्यात मासिक पाळीची (menstrual period) अडचण आणि त्याचा त्रास नको म्हणून तुम्हीदेखील पाळी पुढे ढकलण्यासाठी औषध घेण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा.


लग्न, सण किंवा एखादं धार्मिक कार्य मासिक पाळीची अडचण नको म्हणून अनेक महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. कुठे फिरायला जायचं असल्यासही अनेक तरुणीही या गोळ्यांचा वापर करतात.


मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यानं मासिक पाळीसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे गोळ्या सुरू असेपर्यंत पाळी येत नाही. मात्र गोळ्या घेणं थांबवताच पाळी सुरू होते.


तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या परस्पर घेऊ नयेत. डॉक्टर संपूर्ण तपासणी करूनच या गोळ्या देतात. त्यामुळे वैद्यकीय सल्लानुसारच गोळ्या घ्या. थेट मेडिकलमधून घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतील.


एखादवेळेस गोळ्या घेऊन मासिक पाळीचं चक्र बदलणं ठिक आहे, मात्र त्याची सवय लावून घेऊ नका. अनेक स्त्रियांनी या गोळ्या घेणं योग्य नसतं.


गोळ्या घेणं थांबल्यानंतर सहसा मासिक पाळी सुरू होते. मात्र काहींना पाळी न येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही दिवसात पाळी न आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.