कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना आपल्या त्वचेचा पोत काय आहे याची माहिती घ्या. ड्राय, ऑईली किंवा कॉम्बिनेशन स्किन, सेन्सिटिव्ह आहे हे माहिती असायला हवं. त्यानुसार आपल्या स्किन टाईपला सूट होणारे प्रोडक्ट निवडा.
2/ 9
याशिवाय मॉश्चरायझर किंवा नाईट क्रीम वापरल्यामुळे रात्री आपली स्कीन रिपेयर होण्यास मदत मिळते.
3/ 9
रात्रीच्या वेळी पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर रिंकल्स, डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार होण्याचे त्रास व्हायला लागतात. झोप पूर्ण न होण्याची अनेक कारणं असली तरी देखील यावर उपाय शोधा.
4/ 9
रात्री कमीतकमी 7 तास झोपायला हवं. चेहऱ्यावर कोणतंही क्रीम किंवा फेस पॅक लावून स्किन प्रॉब्लेम कमी करण्याआधी पूर्ण झोप घेण्याला महत्त्व द्या. त्यासाठी जास्त झोपायची ही वाईट सवय बंद करा.
5/ 9
मद्यपान करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. अतिरिक्त मद्यपान करण्यामुळे शरीराबरोबर त्वचेवर ही परिणाम दिसायला लागतात. त्वचेवरची चमक कमी होऊन स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. त्यामुळे मद्यपानावरती नियंत्रण करा.
6/ 9
धुम्रपानामुळे फुफ्फुसांना त्रास होतोच याशिवाय त्वचाविकार होतात. धूम्रपानाची सवय पूर्णपणे बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीराबरोबर त्वचेला देखील त्रास होतो.
7/ 9
बऱ्याच जणांना कमी प्रमाणामध्ये पाणी प्यायची सवय असते. काही लोक केवळ घसा ओला होण्याइतकंच पाणी पितात. मात्र, ही सर्वात वाईट आणि घातक सवय आहे.
8/ 9
आपल्या शरीराला दिवसभरात किमान 8 ग्लास पाण्याची आवश्यकता असते. कमी पाणी पिण्यामुळे आपलं शरीर डीहायड्रेशन होतं आणि त्याचे परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर दिसायला लागून त्वचा कोरडी होते.
9/ 9
या शिवाय झोपताना आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप काढून झोपा.