अभिनेत्री तापसी पन्नूने केला हटके Ramp Walk; फोटोंची होतेय जोरदार चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) अनुप जलोटांच्या 'चौदहवी का चांद' या LIVE गाण्यावर जबरदस्त रॅम्पवॉक केला आहे. नेहमीच्या साचेबद्ध रॅम्पवॉकपेक्षा हा शो हटके ठरला. पाहा PHOTOS
अभिनेत्री तापसी पन्नूनं आपल्या हटके अदांनी पुन्हा चाहत्यांना भुरळ घातली आहे. एका फॅशन वीक दरम्यान तिनं रॅम्पवॉक केला आणि तोही खूप साध्या आणि वेगळ्या पद्धतीने.
2/ 8
फॅशन रॅम्पवॉक म्हटलं की, नेहमीचं ठेकेबाज म्युझिक, प्रखर लाइट्स आणि चेहऱ्यावरची माशीही हलणार नाही अशा साचेबद्ध मॉडेल्स दिसतात. पण lakme Fashion week मधला एक शो वेगळा दिसला.
3/ 8
लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर गौरांग शाहसाठी रॅम्प वॉक करताना अनुप जलोटा LIVE गात होते. चाँद या कलेक्शनसाठी सगळी चंद्रावरची गाणी होती आणि चौधवी का चाँदला तापसीने एंट्री घेतली.
4/ 8
तापसी म्हणते, 'फॅशनमध्ये दोन गोष्टींची काळजी घेते, एक म्हणजे मी जे काही घालणार आहे ते मला शोभेल का आणि रॅम्पवॉकमध्ये मी कशी दिसेन? Ramp walk माझं स्वप्नं होतं, ज्याची मला सतत भीती वाटायची. आता ती भीती दूर झाली आहे.'
5/ 8
गौरांगने मला मोकळेपणाने एक्स्प्प्रेस व्हायची मुभा दिली. अभिनय करायची गरज नाही, असं सांगित्याचंही तापसीने म्हटलं आहे.
6/ 8
तापसीच्या मते फॅशन म्हणजे काय असं विचारल्यावर ती म्हणाली, आपल्याला आपल्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटलं पाहिजे.
7/ 8
गौरांने त्याच्या 'चाँद' कलेक्शनसाठी भारतभरातून सुमारे 40 जामदानी साड्या डिझाइन करून घेतल्या होत्या.
8/ 8
तापसीने नेसलेली कलरफुल साडी तिचा बिनधास्त रॅम्पवॉक यामुळे हे फोटो आणि video व्हायरल झाले आहेत. (फोटो साभार: Viral Bhayani)