

उद्या ६ जानेवारी २०१९ ला या वर्षातलं पहिलं सूर्य ग्रहण (solar eclipse) आहे. ५ जानेवारीला मध्यरात्रीपासून सूर्य ग्रहणाची सुरुवात होईल. हे सूर्य ग्रहण ६ जानेवारीपर्यंत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ग्रहणात सूर्य पाहणं अशुभ मानलं जातं. मात्र ग्रहण संपल्यानंतर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या घरी कधीच पैशांची तंगी जाणवणार नाही.


हिंदू धर्मात दानाला फार महत्त्व आहे. दान केल्यावर पुण्य मिळतं त्याचप्रमाणे आपली पापंही कमी होतात असं पुराणात म्हटलं आहे. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर एका गरजू व्यक्तीला त्याला हवी असलेली वस्तू दान करा.


हिंदू धर्मात ग्रहणानंतर आंघोळ करुन शरीर शुद्ध करण्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. यामुळे ग्रहण संपल्यावर सर्वातआधी आंघोळ करा आणि नवीन धुतलेले कपडे घाला.


ग्रहण संपल्यानंतर ताजं चपातीचं पीठ मळा आणि गायीला चपाती खायला द्या. असं करण्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि घरात पैसा खेळत राहतो, असे काहींचे मत आहे.