

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने नुकताच, मंगळ ग्रहावर परीक्षणासाठी perseverance rover नावाचं यान पाठवलं होतं. मंगळ ग्रहावर पोहोचल्यानंतर त्या यानाने काही फोटो पाठवले आहेत. (फोटो: Twitter NASA)


20 फेब्रुवारीला नासाच्या या रोव्हरने नेविगेशन कॅमेरा वापरून मंगळाच्या भूगर्भाचं परीक्षण करणारे फोटो काढले.


पर्सिव्हरन्स रोव्हर जेव्हा मंगळ ग्रहावर उतरलं, त्या क्षणी हे छायाचित्र टिपण्यात आलं आहे. (फोटो: Twitter NASA)


'हजार्ड' या कॅमेराद्वारे नासाने आज पर्यंतच सर्वात 'हाय रेजोल्युशन' असं छायाचित्र टिपलं आहे. हा कॅमेरा रोव्हरच्या खाली लावण्यात आला आहे. त्याचबरोबर रोव्हर वर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्या माध्यामातून मंगळ ग्रहावरची विविध छायाचित्र टिपण्यात येणार आहेत.तसेच या छायाचित्रात मंगळावरील 'जजीरो क्रेटर' स्पष्टपणे दिसत आहे. हे छायाचित्र 18 फेब्रुवारीलाच घेण्यात आलं होत, मात्र नासाने ते 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलं आहे.


पर्सिवियरेंस रोव्हर मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर टिपण्यात आलेलं हे पहिलं छायाचित्र आहे.MROच्या हायराइज कॅमेराच्या माध्यमातून ते घेतलेलं आहे.हे छायाचित्र 19 फेब्रुवारीला घेण्यात आलं होत. या छायाचित्रातून ग्रहावरील विविध गोष्टी दिसून येत आहेत.


पर्सिवियरेंस रोव्हर मध्ये 'मास्टकॅम झेड'नावाची एक विशिष्ट कॅमेऱ्याची जोडी आहे. संशोधक कॅमेराच्या रंगचा आणि विविध सेटिंगचा मार्कर सारखा वापर करणार आहेत.'मास्टकेम 'कॅलिफोर्निया च्या सेन डीयागो मधील मालीन स्पेस सायन्स सिस्टमने तयार केलं आहे.