

शवपेटी म्हणजे व्यक्ती मृत झाल्यानंतर तिला त्यामध्ये ठेवलं जातं. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणीच या शवपेटीत झोपत असेल आणि तेदेखील दीर्घकाळ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. मात्र हे खरं आहे. असा एक देश आहे, जिथं लोक आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी जिवंतपणीच काही वेळ कॉफिन म्हणजे शवपेटीत स्वतःला बंद करून घेतात. (फोटो सौजन्य - Pixabay)


शवपेटीत बंद होऊन लोक मृत्यू अनुभवतात. यामुळे त्यांना जीवनाचं महत्त्वं समजण्यात मदत होते. याला सामूहिक हिंलिंग थेरेपी असं म्हटलं जातं. लिव्हिंग हिलिंग म्हणून काही लोक एकत्र येत एकाच वेळी शवपेटीत बंद होतात.


इतकंच नव्हे तर शवपेटीत बंद होण्यापूर्वी त्या सर्व विधी केल्या जातात ज्या मृत्यूनंतर शवपेटीत बंद करताना केल्या जातात. शवपेटीत बंद होण्यापूर्वी लोक 10 मिनिटं बसून आपलं मृत्यूपत्रंही लिहितात आणि काही लोक ते मोठ्यानं वाचतातही. शवपेटीत झोपण्याच्या आधीच हे केलं जातं.


ही वर्षानुवर्षे चालत आलेली कोणती धार्मिक परंपरा नाही. तर याच दशकात सुरू झालेली ही परंपरा आहे. दक्षिण कोरियात 2012 साली ही पद्धत सुरू करण्यात आली. होवोन हिलिंग सेंटरनं ही थेरेपी सुरू केली.


या केंद्रात मोठ्या संख्येनं लोक स्वतःला शवपेटीत बंद करून घेतात आणि मृत्यूचा अनुभव घेतात. अगदी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण रितीरिवाजाप्रमाणे 10 मिनिटं शवपेटीत बंद होतात. यामध्ये अनेक बिझनेसमॅन, डॉक्टर्सचाही समावेश आहे.


ही थेरेपी घेणाऱ्या अनेक लोकांच्या मते, एकदा आपल्याला मृत्यूचा अनुभव आला की आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. मृत्यूचा अनुभव जितक्या लवकर घेतला जाईल, तितका तो चांगला, असं काही जणांचं म्हणणं आहे.