होय! मासे आणि सोशल डिस्टन्सिंगचा आहे जवळचा संबंध; पाहा कसा...
कोरोनाच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ही बाब अत्यंत महचत्त्वपूर्ण मानली जात आहे. पण माशांचाही (Fish) सोशल डिस्टन्सिंगशी (Social Distancing) फार जवळचा संबंध आहे. ही बाब एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे.


माशांच्या (Fish) मेंदूचा (Brain) सोशल डिस्टन्सिंगशी जवळचा संबंध आहे. एका आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार माश्यांच्या मेंदूत असा एक पदार्थ असतो की जो आसपास दुसऱ्या जीवांची उपस्थिती (Presence) आहे याची जाणीव करुन देतो. झेब्राफिशवर (ZebraFish ) केलेल्या संशोधनातून कोविड -19 (Covid-19)च्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोशल डिस्टन्सिंगची मानसिकता आणि त्याचा प्रभाव याविषयी अधिक माहिती मिळते. (संग्रहित छायाचित्र : Pixabay)


मेंदूविषयक संशोधन करणाऱ्या मॅक्स प्लॅंक इन्स्टिटयुट फॉर ब्रेन रिसर्चने एरिक शुमेन यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पथकाने केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की झेब्राफिशच्या डोक्यामध्ये मेक्नोसेंन्शेशन (Machnosansation) यंत्रणा असते आणि पाण्यातील घडामोडींच्या आधारे त्याच्या शरीरात एक हॉर्मोन स्रवतो. याआधारे तो आपल्या आसपास असलेल्या दुसऱ्या प्राण्यांच्या उपस्थितीबाबत जाणून घेऊ शकतो. (संग्रहित छायाचित्र : Pixabay)


वैविध्यपूर्ण सामाजिक स्थितीमुळे (Social Conditions) जनावरांच्या वागणुकीवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर सामाजिकदृष्ट्या एकटा राहणारा माणूस आणि माशांसह अन्य प्राण्यांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते. असे असतानाही मात्र सामाजिक वातावरणानुसार मनाची स्थिती अद्यापही पूर्णपणे समजून घेतल्याचे दिसून येत नाही. सामाजिक बदलांमुळे मेंदूतील जनुकीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी ल्युकल एनेसर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे आणि वेगवेगळ्या स्वरुपात झेब्राफिश पाळले. (प्रतिकात्मक छायाचित्र : Pixabay)


वैज्ञानिकांनी आरएनए सिक्वेंन्सचा (RNA Sequence) वापर करीत हजारो न्युरोनल जीन्सच्या अभिव्यक्तीची पातळी मोजली. एनेसर म्हणाला, की जे मासे सामाजिक अलगीकरणात (Social Isolation) वाढले आहेत त्यांच्या स्वभावात, अभिव्यक्तीत बदल झाल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक पॅराथायराईड हार्मोन 2 (Pth2) कोडिंगमध्ये होता. जो मेंदूतील पेप्टाईड आहे. याबाबत अद्यापपर्यंत माहिती उपलब्ध झाली नव्हती. या हार्मोनच्या घनतेच्या अभ्यासावरुन असे दिसून आले की एकटया राहणाऱ्या झेब्राफिशमध्ये हा हार्मोन नव्हता. पण टॅंकमधील अन्य माश्यांसोबत जेव्हा त्याला सोडले तेव्हा या हार्मोनच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. (प्रतिकात्मक छायाचित्र : Pixabay)


या संशोधनामुळे उत्साह वाढलेल्या संशोधकांनी अधिक संशोधनासाठी एकट्या राहणारा माशाला माश्यांच्या समूहात टॅंकमध्ये सोडले. त्यानंतर केवळ 30 मिनिटांतच त्या माशाची हार्मोन (pth2) पातळी झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. 12 तासांमध्ये हा मासा अन्य माश्यांप्रमाणे झाला.


यामध्ये प्रश्न एकच होता की एक प्राणी दुसऱ्या प्राण्यास कसा ओळखतो. ही प्रक्रिया होत असताना जनुकीय अभिव्यक्तीमध्ये कसे बदल होतात. ही ओळख पाहून, वासाने किंवा तोंडाव्दारे होत नाही तर एका मेकोसेन्सेन्शन यंत्रणेमुळे होते. ज्याची प्रक्रिया आसपास असलेल्या माश्यांच्या शारिरीक हालचालींमुळे कळते. ही हालचाल ते संवेदी अवयवांव्दारे करतात. (प्रतिकात्मक छायाचित्र : Pixabay)


जशी माणसाला (Humans) स्पर्शाव्दारे जाणीव होते. तसेच झेब्रा माश्याला अन्य माशांच्या पाण्यातील हालचालींवरुन जाणीव होते. संशोधकांनी जेव्हा कृत्रिमपणे पाण्याची हालचाल केली तेव्हा या माश्याने अन्य मासे पाण्यात हालचाल करीत असल्यावर ज्या प्रतिक्रिया देतो त्या प्रमाणे प्रतिक्रिया दिली. यावरुन संशोधकांनी दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आपल्या मेंदुवर खोलवर परिणाम होत असतो. तसेच मेंदूतील हार्मोन सामाजिक मेंदू (Social Brain) आणि वागणूकीवर परिणाम होत असावा असा निष्कर्ष मांडला. (प्रतिकात्मक छायाचित्र : Pixabay)