लोकांच्या खाण्या- पिण्याच्या सवयी असतात तसंच झोपण्याबाबतही असतं. कोणाला अंगावर चादर ओढून झोपण्याची सवय असते तर कोणी तोंड खुपसून झोपतं. यातल्या काही सवयी घातकही आहेत. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात...
2/ 8
झोपताना डोक्यावर पांघरून ओढून झोपल्यावर अनेकांना झोप लागते. तुम्हाला अशी सवय असेल तर झोप लागण्यापूर्वी थोडावेळ तोंड उघडं ठेवा त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होईल.
3/ 8
श्वसनाचे आजार असलेल्यांनी विशेषत: अस्थमा, हृदय विकार असणाऱ्यांनी तर तोंड झाकून अजिबात झोपू नये. अन्यथा श्वास गुदमरण्याचा त्रास होऊ शकतो.
4/ 8
स्लीप अॅप्निया एक अशी स्थिती आहे ज्यामुळे झोपल्यावर श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे तोंडावर घेऊन झोपणं टाळलं पाहिजे.
5/ 8
तोंडावर घेऊन झोपल्याने गरमीचा त्रास होऊन झोपमोड होउ शकते. त्यामुळे सूजणे, चक्कर येणे किंवा अंग दुखण्याचा त्रास होइ शकतो. परिणामी थकवा जाणवतो.
6/ 8
एका संशोधनानुसार तोंडावर घेऊन झोपल्याने ब्रेन डॅमेजचा धोकाही संभावतो. पांघरून पूर्ण ओढून झोपल्यावर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
7/ 8
तोंड खुपसून झोपल्याने अल्झायमर आणि डिमेन्शिया होण्याची शक्यता असते यामुळे तुम्हालाही अशी सवय असेल तर काळजी घ्या.
8/ 8
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.