जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तांदळाचे पीठ आणि ब्लॅक टी मिक्स करून फेस पॅक बनवा. सर्व प्रथम एका भांड्यात एक कप उकळलेले पाणी भरा आणि त्यात एक ब्लॅक टी बॅग 2-3 मिनिटे भिजत ठेवा. आता त्यात प्रत्येकी एक चमचा तांदळाचे पीठ आणि मध घाला. ही पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा धुवा.