शरीरातील अतिरिक्त साखर घालवण्यासाठी शरीर त्याचं लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर मधुमेहींच्या हातापायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर त्वचा कोरडी होऊ शकते. कोरड्या त्वचेमुळे खाज सुटू शकते, त्वचेवर क्रॅक येतात आणि त्यामुळे त्वचेचा संसर्ग, जळजळ, लालसरपणा अशा समस्या दिसू लागतात.
बुरशीजन्य संसर्ग कुणालाही होऊ शकतो, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये याची जास्त शक्यता असते. त्वचा लाल होणं, खाज सुटणं, फोड आणि पुरळ येणं आदी समस्या दिसू लागतात. त्वचेवर लहान फोड दिसतात, ते मुरुमांसारखेच असतात मात्र दुर्लक्ष केल्यास ते पिवळसर किंवा लालसर तपकिरी रंगासह सूजलेल्या आणि कडक त्वचेचे ठिपके बनतात.