झोपेतून उठून थेट बाथरूमला जाणं ठरू शकतं घातक! नेमकी कुठे होते चूक?
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लोकांकडे वेळ खूप कमी असतो. त्यामुळे बऱ्याचदा ते सगळ्याच गोष्टींमध्ये गडबड करताना दिसतात. बऱ्याचदा गडबडीत आपल्याला काही अशा सवयी लागू शकतात. ज्या आपल्याला चुकीच्या वाटत नाहीत. मात्र त्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
व्यस्त आयुष्यामुळे लोक अनेकदा भराभरा खाणं, अपुरी झोप घेणं अशा चुका करतात. मात्र आणखी एक गोष्ट आहे ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक त्रास होण्याची शक्यता असते.
2/ 6
घाईगडबडीत आपण बऱ्याच चुका करतो ज्यांचे नंतर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. झोपेतून उठून थेट बाथरूमला जाणं, ही चुकही आपल्या आरोग्यासाठी हानीकारण ठरू शकते.
3/ 6
चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी आपण व्यवस्थित झोप घेणे आवश्यक असते. व्यक्तीने कमीत कमी 6 तास झोप घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे झोपेतून उठून थेट बाथरूमला जाणेदेखील आपल्यासाठी घातक ठरू शकते.
4/ 6
झोपेतून अचानक उठल्यावर आपला रक्तदाब कमी असतो. त्यामुळे झोपेतून उठल्यावर काही वेळ थांबावे आणि नंतर बाथरूमला जावे. यामुळे तुमचे शरीर सामान्य परिथिती येते.
5/ 6
झोपेतून उठून थेट बाथरूमला गेल्यास हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. हे जीवावर बेतू शकते त्यामुळे याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे.
6/ 6
आगरा येथे भारत विकास परिषद संपर्क शाखेने फतेहबाद येथील एका हॉटेलमध्ये आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेदरम्यान डॉ. संध्या जैन यांनी ही माहिती दिली आहे.