स्वयंपाक कितीही चांगला केलो, पण जर त्यात मिठाचे प्रमाण योग्य नसले तर त्या जेवणाची चव बिघडते. तिखट- आंबट गोड या सगळ्या गोष्टी जशा जेवणात महत्त्वपूर्ण असतात तसेच जेवणात मीठ असणेही फार आवश्यक आहे. पण जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला जेवणात वरून मीठ घातल्याचे काही दुष्परिणाम सांगणार आहोत.
मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामधून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि थायरॉइडसारख्या रोगापासून आपले संरक्षण होते. शरीरासाठी मीठ जरी आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण हे पाच ग्रामपेक्षा जास्त असू नये. जर हे प्रमाण वाढलं तर त्याचा परीणाम रक्तदाबावर होऊ शकतो.
घरात वेग वेगळ्या वयांची सदस्य राहत असतात. वयोमानानूसार वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार हानिकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. तसेच काकडी, मुळा, कांदा यांच्यावर वरून मीठ कधी घालू नये.