

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.


मेष- आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, प्रेमामुळे आज आपली झोप उडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे.


वृषभ- वादविवादातून त्रास होईल. संवाद साधताना शब्द जपून वापरा.अपेक्षेनुसार आज गोष्टी घडणार नाहीत निराश होऊ नका.


मिथुन- जोडीदारासोबत आज आपल्याला आनंद मिळेल. आपल्या हट्टी स्वभावाला मुरड घालणं गरजेचं आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.


कर्क- कुटुंबातील सदस्यांमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. सावधगिरी बाळगली नाही तर आपलं बरंच नुकसान देखिल होऊ शकतं.


सिंह- नवीन करार फायदेशीर वाटतील. प्रिय व्यक्तीचा मूड बदलण्यात अपयश मिळेल. आगामी काळासाठी नियोजन करणं फायद्याचं ठरेल.


तुळ- नको ते विचार करून मेंदूवर ताण देऊ नका. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञ किंवा मोठ्यांचा सल्ला घ्या.


वृश्चिक- आचनक प्रवास करावा लागल्यानं थकवा जाणवेल. आजचा दिवस आनंददायी असेल. समस्यांकडे आज दुर्लक्ष करा.


धनु- आर्थिक व्यवहार करताना सावधान बाळगा, आज इच्छेप्रमाणे गोष्टी होणार नाहीत पण संयम सोडू नका.


मकर - विश्रांती घ्या, गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेणं हिताचं आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.


कुंभ- थकवा आणि तणावापासून आराम मिळेल. समस्या सोडवण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नियोजनानं आजच्या दिवसाची सुरुवात करा.