Home » photogallery » lifestyle » SHANI JAYANTI 2022 DAAN REMEDIES FOR SADESATI DHAIYA AND SHANI DOSH AJ

Shani Jayanti 2022 : शनि जयंतीला या वस्तूंचं दान करा; सुख-समृद्धी वाढेल, संकटं दूर होतील

यंदा शनि जयंती (Shani Jayanti) सोमवार, 30 मे रोजी आहे. शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ अमावस्येला झाला. यामुळे दरवर्षी शनि जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी ज्येष्ठ अमावस्या तिथी 29 मे रोजी दुपारी 02:54 ते सोमवार, 30 मे रोजी दुपारी 04:59 पर्यंत आहे. सोमवार असल्याने हा दिवस सोमवती अमावस्या सुद्धा आहे. 30 वर्षांनंतर असा योगायोग घडला आहे की, शनि जयंती, सोमवती अमावस्या जेष्ठ अमावस्येला एकत्र आलेत. शनि जयंती निमित्त शनिदेवाची पूजा करून साडेसाटी, धैय्या किंवा शनिदोषाच्या दुखापासून आराम मिळू शकतो. या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून शनि जयंतीला दान करावयाच्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

  • |