पालकांनो, मुलांशी बोलण्यास उशीर नको; Sex Education देण्याची हीच ती योग्य वेळ
भारतात मुलांसमोर सेक्सचा (Sex) विषयही काढला जात नाही. मात्र तरीही इंटरनेटमुळे मुलांपासून काहीही लपून राहत नाही. त्यामुळे योग्य वयात मुलांशी पालकांनी याबाबत बोलायला हवं.
|
1/ 7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना शरीराच्या सर्व अवयवांबाबत पुरेशी माहिती द्या.
2/ 7
मूल 4 वर्षांचं झाल्यानंतर त्याला त्याच्या गुप्तांगाबाबत माहिती द्या. शिवाय आईच्या पोटात ते कुठे होते हेदेखील सांगा
3/ 7
आई आणि वडील या दोघांमुळे त्याचा जन्म कसा झाला हे त्यांना वयाच्या आठव्या वर्षी सांगू शकता. वडीलांच्या शरीरातील स्पर्म आणि आईच्या शरीरातील एग्ज एकत्र झालं आणि त्यानंतर तो आईच्या गर्भातून कसा बाहेर आला ते सांगा.
4/ 7
मूल 10 वर्षांचं झाल्यानंतर सेक्सबाबत त्याच्याशी मोकळेपणाने बोला. बलात्कार, छेडछाड अशा बातम्या कानावर पडतात, त्यावेळी मुलं प्रश्न विचारतात, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, याबाबत त्यांना पुरेशी माहिती द्या.
5/ 7
पंधराव्या वर्षात मुलं समजूतदार होतात, सेक्सबाबत माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला योग्य मार्गदर्शन करा.
6/ 7
तुमच्या मुलाला त्याच्या वयाच्या मानाने सेक्सपेक्षा अधिक माहिती हवी असेल, तर त्याला लज्जास्पद वाटू देऊ नका, त्याला प्रेमाने समजवा.
7/ 7
ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.