जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात ज्या कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे, त्या लशी इंजेक्शनमार्फत दिल्या जाणाऱ्या आहेत. दरम्यान काही ठिकाणी नाकावाटे दिल्या जाणारी लसही तयार करण्यात आली आहे आणि भारतातही या लशींच ट्रायल सुरू होणार आहे.