राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; कसा कराल स्वत:चा बचाव
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवणं आता तुमच्या हातात आहे.
|
1/ 15
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. लोक कोरोना नियमांचं पालन करत नाही त्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.
2/ 15
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायला हवं आणि काय नाही हे जाणून घ्या.
3/ 15
वैयक्तिक स्वच्छता राखा. किमान 20 सेकंद स्वतःचे हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ करा.
4/ 15
घराबाहेर पडताना सोबत हँड सॅनिटायझर ठेवा.
5/ 15
घराबाहेर पडताना मास्क जरूर घाला.
6/ 15
खोकताना, शिंकताना तोंडावर टिश्यू पेपर किंवा रूमाल ठरला. यापैकी काहीच नसेल तर आपल्या हाताचं कोपराजवळील भाग तोंडाजवळ न्या.
7/ 15
चेहऱ्यावर मास्क असेल तर शिंकताना, खोकताना मास्क काढू नका.
8/ 15
मास्क, ग्लोव्ह्ज, पीपीई किट यांचा वापर करून झाल्यावर त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा.
9/ 15
सार्वजनिक ठिकाणी आपल्या जवळील व्यक्तीपासून किमान सहा फूट सोशल डिस्टन्सिंग राखा.
10/ 15
शक्यतो वर्क फ्रॉम होमच करा.
11/ 15
जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर घरीच राहा. ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जा.
12/ 15
चेहरा विशेषतः डोळे, नाक आणि तोंड यांना वारंवार स्पर्श करणं टाळा.
13/ 15
गर्दीच्या ठिकाणी जाणं आणि जास्त लोकांच्या संपर्कात येणं टाळा.
14/ 15
छोटे मॉल, जीम, रेस्टॉरंट, पब जिथं सोशल डिस्टन्सिंग राखणं शक्य नाही तिथं जाऊ नका.