बाबो! यांच्या शरीरातून तर आरपार दिसतं; काचेसारखे पारदर्शी असलेले जीव
असे बरेच जीव आहेत ज्यांची काचेसारखी पारदर्शी शरीररचना (transparent animal) म्हणजे रहस्यमयीच आहे.
|
1/ 7
निसर्गात एकापेक्षा एक आश्चर्य दडलेली आहेत. सागरीजीवसृष्टीबद्दल तर आजही अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. एक सागरीजीव तर विना ऑक्सिजन जगतो. तर काही जीव हे पाण्यासारखे पारदर्शी आहेत.
2/ 7
सागरीजीव हे शिकार करण्यासाठी किंवा शिकार होण्यापासून वाचण्यासाठी परिस्थितीनुरूप रूप धारण करतात. दगडात किंवा हिरव्या गवतातील जीव त्याच्या अनुरूप रंग धारण करतात. पण असे काही जीव आहेत ज्यातून प्रकाश परावर्तित होऊ शकतो.
3/ 7
ग्लास ऑक्टोपस (Glass octopus) असा सागरी जीव आहे जो 18 इंच लांब असून याचं संपूर्ण शरीर पारदर्शी असते. ग्लास ऑक्टोपस त्याच्या डोळ्यांना फार मोठे बनवतो ज्यातून प्रकाश परावर्तित होऊन शिकार होण्यापासून तो स्वत:ला वाचवतो.
4/ 7
समुद्रात सी वॉलनट (Sea walnut) नावाची एक प्रजातीसुद्धा पारदर्शक आहे. याला डोकं आणि डोळे नसतात, तर हा अतिशय हळू हळू चालणारा प्राणी आहे.
5/ 7
समुद्र साल्प (Sea Salp) हा जीव लांब आणि पारदर्शी असतो. हे नेहमी पाण्यात तरंगत असतात. हा एक वेगळा जीव असून यात जीव आणि वनस्पती असे दोन्ही गुण आढळतात.
6/ 7
क्रोकोडाइल आइसफिश (Crocodile Icefish) हादेखील एक वेगळा सागरी जाव आहे, जो गरजेनुसार स्वत:ला पारदर्शी बनवतो.
7/ 7
हा जीव एक प्रकारचं बेडूकच आहे, ज्याला ग्लास फ्रॉग (Glass frog) म्हणतात. हा याच श्रेणीतला जीव आहे पम सागरी नाही, तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळतो.