

एका शाळेचा बस ड्रायव्हर मुलांना घेऊन फरार झाला. हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा सारेच चिंताग्रस्त झाले. आपली मुलं सुरक्षित असतील ना या विचारांनी त्यांना ग्रासलं. पण थोड्याच वेळात त्यांच्या चिंतेची जागा आनंदाने घेतली.


तुम्हीही विचारात पडला असाल की नेमकी असं काय झालं असेल. मुलं बेपत्ता झाल्यावर पालक चिंताग्रस्त होण्यापेक्षा आनंदात का होते?


अमेरिकेतील अलबामा राज्यातील मोंटेवेलो स्कूल बस चालवणारा चालक वेन प्राइजला शाळेकडून एक खास मेसेज मिळाला होता. शाळेच्या परिसरात भरपूर बर्फ पडत असल्यामुळे शाळा उशीराने सुरू होणार आहेत. यामुळे मुलांना सकाळचा नाश्ता देण्यात येणार नाही.


हा मेसेज मिळाल्यानंतर बस चालकाने स्वखर्चातुन मुलांना नाश्ता देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व मुलांना घेऊन तो एका हॉटेलमध्ये गेला.


हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने सर्व मुलांसाठी सँडविच आणि बिस्कीट विकत घेतली. दरम्यान, जेव्हा शाळेने पालकांना त्यांची मुलं शाळेत आले नसल्याचे कळवले तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला.