

2015 साली सौदीच्या राजानं 300 मिलियनला पॅरिसमधील 57 एकरावर असलेला बंगला खरेदी केला. त्यानंतर राजाची चर्चा साऱ्या जगभर झाली. त्या दिवसापासून चर्चा सुरू झाली ती राजेशाही थाटाची.


राजवाड्यातील कलर, झुंबर, पेटिंग्स अशा एक ना अनेक गोष्टी पाहिल्यानंतर तोंडात बोटं जातील. जगातील काही सुंदर इमारतींमध्ये या राजवाड्याची गणना होते.


पॅरिसच्या या बंगल्याला राजा केव्हा तरी भेट देतो. पण, त्याच्या देखभालीसाठी करोडो रूपये महिन्याला खर्च होतात.


सौदीच्या राजानं याट देखील खरेदी केली आहे. जगातील सर्वात उत्तम याटपैकी ही एक आहे. तिला पाहिल्यानंतर तिची भव्यता लक्षात येते. शिवाय, प्रत्येक जण तिच्या प्रेमात देखील पडतो. ही याट पाहिल्यानंतर याटच्या किमतीचा अंदाज येतो.


केवळ खास आणि मर्जीतील लोकांसाठीच प्रिन्स या याटवर पार्टीचं आयोजन करतो. याटवरती स्वीमिंग पूल, हॅलिपॅड आणि सर्व सोयी - सुविधा देखील आहेत.


दोन वर्षापूर्वी सौदीच्या या प्रिन्सनं मालदीव येथे जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी हॉलिवुडचे सेलिब्रेटी देकील हजर होते. आठवडाभर मजा - मस्ती असा सारा माहोल होता. यासाठी सर्व अलिशान हॉटेल्स आणि व्हिला बुक करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 57 कोटी एवढा खर्च आला होता.


देशातील सर्वात महागाड्या या सौदीच्या राजाच्या ताफ्यात आहेत. जवळपास 18 महागड्या सध्या सौदीच्या राजाकडे आहेत.


अरब युनिव्हर्सिटीमध्ये सौदीच्या राजानं शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 30व्या वर्षी या राजानं देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार सांभाळली. येमेन युद्धामुळे खूप मोठा अनुभव मिळाला.