Home » photogallery » lifestyle » RUSSIA CORONA NEW CASES HIT DAILY RECORD RUSSIAN GOVERNMENT PLANNED TO VACCINATE ARMED FORCES AGAINST COVID 19 MHPL
पुन्हा वाढले कोरोना रुग्ण; आता फक्त आरोग्य क्षेत्रातील नाही तर सीमेवरच्या योद्धांनाही देणार लस
4 लाखांपेक्षा जास्त जवानांचं कोरोना लशीकरण (corona vaccination) करण्याची योजना सरकारनं आखली आहे.
|
1/ 5
रशियामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढू लागला आहे. त्यामुळे आता देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना कोरोनापासून संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू झाल्यास आहेत. (फोटो सौजन्य - एपी)
2/ 5
रॉयटर्सच्या वृत्तानुसार रशियामध्ये चार लाखांपेक्षा अधिक जवानांना कोरोनाची लस दिली जाणार आहे, अशी माहिती रशियाचे संरक्षणमंत्री सेरगेई शोईगू यांनी दिली आहे. (फोटो सौजन्य - एपी)
3/ 5
आतापर्यंत 2,500 जवानांचं लशीकरण केल्याचंही त्यांनी सांगितलं. या वर्षाअखेरपर्यंत 80,000 जवानांना लस देण्याचा उद्देश आहे. (फोटो सौजन्य - एपी)
4/ 5
रशियामध्ये सप्टेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज 27,543 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. आता एकूण रुग्णांची संख्या 2,215,533 झाली आहे.
5/ 5
जगात सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. यूएस, भारत, ब्राझीलनंतर रशियाचा नंबर लागतो. रशियात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत 38,558 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.