तुमच्या Valentines Day साठी खास रोमॅण्टिक डेस्टिनेशन
व्हॅलेन्टाईन डे (Valentines Day) च्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला फिरायला घेऊन जाणार असाल, तर या Romantic destination वर जरूर जा.
|
1/ 9
लॅन्सडाऊन - उत्तराखंडमध्ये असलेलं हे ठिकाण. शांत आणि सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. तुमच्या जोडीदाराला हे ठिकाण नक्कीच आवडेल.
2/ 9
ऋषिकेश - उत्तराखंड वसलेलं हे ठिकाण तुम्हाला वेडंच लावेल. अशा ठिकाणी तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असेल तर क्या बात !
3/ 9
आग्रा - आग्र्यातील ताजमहाल तर प्रेमाचं प्रतीकच. जगभरातील लोकं इथं येतात. तुमच्या जोडीदाराला ताजमहाल ट्रिप सरप्राइज म्हणून देऊ शकता.
4/ 9
मुन्नार - एखाद्या शांत ठिकाणी जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल, तर केरळमधील मुन्नार ठिकाण खूपच सुंदर आहे. डोंगर, चहाचे हिरवेगार मळे तुमच्या जोडीदाराराचं मन आकर्षित करतील.
5/ 9
कुमारकोम - केरळमध्ये वेम्बनाड तलावाच्या किनारी वसलेलं हे ठिकाण. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासह बॅकवॉटर क्रुझची मजा लुटू शकता. शिवाय प्रायव्हेट बोटही बूक करू शकता.
6/ 9
धर्मशाला - शिमला, कुल्लू आणि मनाली ही हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळं. मात्र याशिवाय धर्मशालाही तुम्ही अवश्य फिरा. स्वर्गात फिरल्याचा आनंद मिळेल.
7/ 9
हॅवलॉक आयलँड - अंदमान निकोबारमधील हॅवलॉक आयलँडवर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक क्षणांचा अनुभव घेऊ शकता.
8/ 9
उटी - तुमच्या जोडीदाराला डोंगराळ भाग आवडत असेल, तर तामिळनाडूतील उटी हे उत्तम ठिकाण आहे. थंडगार हवेत तुमच्या प्रेमाचा आनंद दुप्पट करेल.
9/ 9
काश्मीर - काश्मीराला धरतीवरील स्वर्ग म्हटलं जातं, मग तुमच्या जोडीदाराला या स्वर्गाची सफर जरूर करून द्या.