इतक्या वर्षांनंतर वैयक्तिकरित्या मी जेलमध्ये कोणत्या क्लाइंडला भेटलो तर ती रिया. कारण तिच्या मागे अनेक तपास यंत्रणा होत्या आणि तिला त्रास दिला जात होता. तुरुंगामध्ये ती कोणत्या परिस्थितीत आहे, हे मला पाहायचं होतं. तुरुंगात ती खूप चांगल्या प्रकारे राहत होती, स्वतःची देखभाल करत होती हे पाहून मला खूप समाधान वाटलं. (फोटो सौजन्य - @rhea_chakraborty/इन्स्टाग्राम)
कैद्यांना ती योगा शिकवायची. तुरुंगात राहण्याच्या परिस्थितीनुसार तिनं स्वतःमध्ये बदल केले, तिथं जुळवून घेऊ लागली. कोरोना परिस्थितीमुळे तिला घरचं जेवण मिळायचं नाही त्यामुळे जेलमधीलच जेवण खायची सवय तिने लावली. सामान्य महिलेप्रमाणेच इतर कैद्यांसोबत ती राहायची. (फोटो सौजन्य - @rhea_chakraborty/इन्स्टाग्राम)