नोव्हेंबरच्या या तारखा लक्षात ठेवा; आकाशात दिसणार Virgo constellation, गुरू-चंद्र-शनि Triangle अशा 10 अद्भुत गोष्टी
जर तुम्हाला आकाशात विविध प्रकारचे तारे आणि खगोलीय घटना पाहायला आवडतात तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास आहे. गेल्या महिन्यात मंगळ ग्रह आकाशात चमकताना दिसला होता. या महिन्यात तर एकामागून एक खगोलीय घटना होतील. जे भारतातील एका भागातून सहजपणे पाहाता येतील. फक्त तुमच्या शहरात प्रदूषण कमी असायला हवं. चला तर मग पाहून कोणकोणत्या तारखेला या घटना समोर येतील.


2 नोव्हेंबर - 25 ऑक्टोबर 2020 रोजी बुध ग्रह पृथ्वी आणि सुर्याच्या मधून पार झाला. आता बुध ग्रह म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी सुर्याच्या अत्यंत जवळ होता, याला पेरीहेलियन (Perihelion) म्हणतात. अशात आज सकाळी सुर्याच्या पूर्वी बुध आकाशात पाहायला मिळाला. आता पुढील काही दिवस सुर्याच्या पूर्वी बुध आकाशात दिसेल.


8 नोव्हेंबर 2020 - गेल्या 31 ऑक्टोबर रोजी ब्लू मून पाहायला मिळाला होता. या कारणाने 8 नोव्हेंबर चंद्र आता आपल्या थर्ड क्वार्टरमध्ये पोहोचेल. त्यामुळे चंद्र खाली दिलेल्या फोटोप्रमाणे दिसेल.


10 नोव्हेंबर 2020 - 10 नोव्हेंबर खूप खास आहे. या दिवशी बुध आणि सुर्यामधील अंतर कमी होईल. या दिवशी सकाळी 5.25 वाजता आकाशात Virgo constellation दिसेल, या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता.


14 नोव्हेंबर 2020 - या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असेल. या कारणामुळे दोघांमधील अंतर 3,57,837 km इथपर्यंत येईल. या दिवशी सकाळी 6 वाजता चंद्राच्या शेजारी बुध असेल आणि छोट्या बुधला पाहण्याची ही सर्वात चांगली वेळ असेल. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी तुम्हाला फार त्रास घ्यावा लागणार नाही. फक्त आकाशात चंद्र पाहा आणि बुध त्याच्या जवळच तुम्हाला दिसेल.


17 नोव्हेंबर 2020 17 नोव्हेंबर सर्वात खास दिवस आहे. यादरम्यान तुम्हाला आकाशात उल्का दिसू शकते. सर्वसाधारणपणे आकाशात प्रकाशाची एक रेघेच्या रुपात उल्का दिसते. ज्याला सामान्य भाषेत तुटलेला तारा म्हणतात. वास्तवात उल्का अंतरिक्षात डोंगराच्या आकाराऐवढ्या असतात. जी आपल्या अवकाशात येताच जळून राख होते. जेव्हा उल्का खाली पडले तेव्हा प्रकाश एका बाजूहून दुसऱ्या दिशेना जात असल्याचे दिसते.


19 नोव्हेंबर 2020 - या दिवशी रात्री 8.30 मिनिटांनी गुरु-चंद्र-शनि मिळून आकाशात एक सुंदर त्रिकोण तयार करतील. जेव्हा तुम्हाला हे चित्र दिसेल तेव्हा यासोबत मंगळाच्या वरच्या दिशेला दिसेल. 25 नोव्हेंबर 2020 - या रात्री चंद्राच्या अगदी जवळ मंगळ असेल. जर आकाश स्वच्छ असेल तर तुम्हाला हे नक्की दिसेल. 25 नोव्हेंबर 2020 - या रात्री चंद्राच्या अगदी जवळ मंगळ असेल. जर आकाश स्वच्छ असेल तर तुम्हाला हे नक्की दिसेल.


27 नोव्हेंबर 2020 - चंद्र एपोगी (Apogee) मध्ये पोहोचेल. जे प्रत्येक टक्करमध्ये पृथ्वीपासून सर्वात लांबची स्थिती आहे. या कारणाने चंद्राचं पृथ्वीमधील अंतर 4,05,894 इतक असेल.


28 नोव्हेंबर 2020 - सकाळच्या वेळी चंद्र यूरेनसच्या (अरुण ग्रह) जवळ असेल. मात्र या दरम्यान पौर्णिमा असेल, त्यामुळे युरेनस पाहणं जर अवघड आहे.


30 नोव्हेंबर 2020 - महिन्याच्या शेवटच्या दिवशी पौर्णिमेची रात्र आहे. या दिवशी भारतातील अनेक भाषात पेनुमब्रल चंद्रग्रहण असेल. यामध्ये युरी, बिहार, झारखंड, बंगाल आणि पूर्वोत्तरातील अनेक राज्यांचा समावेश आहे. सायंकाळी 4.32 पासून 5.23 दरम्यान पाहू शकता. पेनुमब्रल चंद्रग्रहणाला उपच्छाया चंद्र ग्रहणही म्हटले जाते. या स्थितीत चंद्रावर पृथ्वीची छाया पडत नाही तर त्याची उपच्छाया पडते. यामध्ये चंद्रावर एक अंधूक छाया दिसते.