ऐकायला विचित्र वाटेल, पण नवरा बायकोने वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचेही असतात फायदे
पती पत्नीचं नातं खूप नाजूक असतं. त्यामध्ये जराही तणाव आला तर तो आला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला पती पत्नीच्या नात्याविषयी जे सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला जरा विचित्रंही वाटू शकते. परंतु पती-पत्नीने वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचेही काही फायदे असतात.
2017 च्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार 4 पैकी 1 जोडपे स्वतंत्र बेडवर झोपतात. असेच एक संशोधन 2012 च्या बेटर स्लीप कौन्सिलच्या सर्वेक्षणात करण्यात आले होते. या संशोधनात किती जोडपे स्वतंत्रपणे झोपतात याविषयी केवळ हा डेटाच नाही तर त्याचे फायदेही सांगितले गेले.
2/ 6
हे सर्व अभ्यास हे दर्शवतात की पती-पत्नीने वेगळे झोपणे चुकीचे नाही. एखादे जोडपे असे वागले म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी तणाव आहे असाच केवळ त्याचा अर्थ होत नाही. काही वेळा वेगळ्या रूममध्ये झोपणे जोडप्यांसाठी सोयीचे ठरू शकते.
3/ 6
जोडीदाराला घोरण्याची किंवा व्यवस्थित न झोपण्याची सवय असेल तर काहीवेळा वेगवेगळ्या खोलीत झोपल्यास झोपेमध्ये अडथळा येत नाही. हे तुमच्या बॉडी हिलिंगसाठी देखील फायद्याचे ठरू शकते.
4/ 6
बऱ्याचदा एखाद्या वादानंतर किंवा कुरबुरीनंतर काही वेळेचे अंतर तुमचे नाते अधिक चांगले बनवू शकते. यादरम्यान तुम्हाला आराम मिळतो आणि तुमचा रागही शांत होतो. कारण शारीरिक जवळीकीसोबत भावनिक जवळीकदेखील आवश्यक असते.
5/ 6
एखादेवेळी जोडीदाराला टीव्ही पाहायचा असेल तेव्हा तुम्ही दुसृया रुमममध्ये झोपल्याने त्यांना त्यांच्या मनासारखे करता येते आणि तुम्हाला आराम करता येतो. तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळाल्याने तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.
6/ 6
हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संशोधनात असे म्हटले आहे की, कधीकधी जोडप्यांसाठी काही अंतर ठेवणे त्यांच्या वैवाहिक संबंधांसाठी चांगले ठरू शकते. यामुळे चिडचिड आणि थकवा कमी होतो. यामुळे वैवाहिक आयुष्य चांगले होऊ शकते.