तुमच्या मधात किती टक्के भेसळ आहे हे तात्काळ ओळखा या पद्धतीने घरीच तपासा
बाजारात विविध पदार्थांमध्ये भेसळ होताना दिसत आहे. ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. भारतात मधाला अमृतासमान मानले जाते. मधाचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. परंतु मधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे समोर आलं आहे.


बाजारात विविध पदार्थांमध्ये भेसळ होताना दिसत आहे. ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. भारतात मधाला अमृतासमान मानले जाते. मधाचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. परंतु मधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे समोर आलं आहे. रस्त्याच्या कडेला बाटलीमध्ये आणि भांड्यांमध्ये विक्री होणाऱ्या मधामध्येच भेसळ होत नाही तर विविध नामवंत ब्रॅण्डच्या मधांमध्येदेखील भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने(CSE) यासंबंधी खुलासा केला असून CSE च्या महानिदेशक सुनीता नारायण यांनी आज याचा खुलासा केला आहे.


सुनीता नारायण यांच्या माहितीनुसार भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्वच ब्रँडमध्ये सारखेच्या सिरपची(Sugar syrup) भेसळ करण्यात येत आहे. याच संस्थेने 2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंक मध्ये कीटकनाशक असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे या मधामधील भेसळ कशी ओळखायची हा मुख्य प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही घरगुती पद्धती सांगणार असून याच्या मदतीने तुम्ही यामध्ये किती टक्के भेसळ आहे हे तात्काळ ओळखू शकणार आहेत.


मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त हे तपासण्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावे लागणार आहेत. जर मध खाली पाण्यात बसले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. पण जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त होते हे सिद्ध होते.


मध भेसळयुक्त आहे कि नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आयोडीनची गरज पडणार आहे. यासाठी तुम्हाला मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.


जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येते. यामुळे हे मध भेसळ असल्याचे सिद्ध होते. यासाठी तुम्ही बाजारातून आयोडीन खरेदी करू शकता.