कच्च्या पपईचे हे फायदे तुम्हाला माहित नसतील, डायजेशनपासून डेंग्यूपर्यंत करते मदत
पपई कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरूपात खाल्ली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला कच्च्या पपईच्या गुणधर्मांविषयी सांगणार आहोत. कच्ची पपई सहसा कोणी खात नाही पण त्याचे अनेक फायदे आहेत.
पपईमध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन, ऊर्जा असे अनेक घटक असतात, ज्यामुळे ती अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते. कच्ची पपई चवीला किंचित कडू आणि गोड असते.
2/ 8
कच्ची पपई इतर पोषकतत्वांसह फायटोन्युट्रिएंट्स, पपेन आणि चिमोपापेन सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जखमा-बरे करण्याचे गुणधर्म देखील आहेत.
3/ 8
कच्ची पपई रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. कच्ची पपई व्हिटॅमिन ए, सी आणि ई ने समृद्ध असते. इन्फेक्शन, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी मदत करू शकते.
4/ 8
कच्च्या पपईमध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे आंबवलेला स्टार्च तयार होण्यास मदत होते जी अंततः आतड्यांमधील फायदेशीर बॅक्टेरियासाठी अन्न म्हणजेच प्रीबायोटिक बनते, जे निरोगी आतड्यांसाठी फायदेशीर असते.
5/ 8
डेंग्यूमध्ये कच्च्या पपईच्या पानांचा रस खूप फायद्याचा असतो. हे पांढऱ्या रक्त पेशींच्या प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यात मदत करते, असेही मानले जाते.
6/ 8
कच्ची पपई स्तनपान करणाऱ्या मातांसाठी फायदेशीर असते. कारण कच्ची पपई खाल्ल्याने स्तनपान करणाऱ्या आईच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.
7/ 8
कच्च्या पपईमध्ये महत्वाचे मिनरल्स असतात आणि ते शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे मिनरल्स इन्सुलिनचे उत्सर्जन वाढवण्यासही मदत करतात. तसेच टाईप 2 मधुमेहासाठी जबाबदार असलेल्या मुख्य एन्झाइमच्या विरूद्धदेखील कार्य करू शकते.
8/ 8
कच्च्या पपईमध्ये अनेक निरोगी एन्झाइम्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्टता होत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)