

मेष- आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी नाही झाल्या तरी संयम राखा.


वृषभ- विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल. भविष्याऐवजी वर्तमानाचा विचार करावा. स्मार्ट वर्क करण्याची तुमची क्षमता कामाच्या ठिकाणी कौतुकास्पद ठरेल.


मिथुन- भीती घालवण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या आणि आनावश्यक गोष्टींपासून दूर ठेवा. आजचा दिवस आपल्यासाठी फार चांगला नाही.


कर्क- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. नवीन तंत्रज्ञाचा कामाच्या ठिकाणी योग्य उपयोग करा. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करू नका.


सिंह- पटकन आलेल्या रागामुळे वाद उद्भवू शकतात. आज आपल्यासाठी दिवस चांगला नाही. प्रिय व्यक्ती आणि कुटुंबियांसोबत वाद होतील. कामाच्या ठिकाणी आपला मू़ड खराब होऊ असू शकतो.


कन्या- आज आपलं आरोग्य चांगलं राहिल. कामातून आलेल्या दबावामुळे मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.


तुळ- कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका. भागीदारीत केलेली कामे शेवटी फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या विरोधाचा तुम्हाला सामना करावा लागू शकेल. दिवस अधिक चांगला वापरण्याची नियोजन करा.


वृश्चिक- गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दुसर्या दिवसासाठी सोडले पाहिजेत. आजचा दिवस निश्चितपणे कार्य करण्याच्या दृष्टीकोनातून धावेल.


धनु- नवीन योजनेमुळे आपल्याला आर्थिक फायदा मिळू शकतो. कामात आज जरी अडचणी आल्या तरी येणारा काळ लाभदायी असेल. वेळेचं महत्त्व समजून काम करा.


मकर - कामाचा दबाव असल्यानं आपल्याला राग येईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. निष्काळजीपणामुळे आरोग्य बिघडू शकतं.


कुंभ- क्षमतेपेक्षा जास्त बडबड करणाऱ्या लोकांपासून चार हात दूर राहा. कामाच्या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं करू शकता. जोडीदाराकडे दुर्लक्ष केल्यानं नुकसान होऊ शकतं.