

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.


मेष-आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज मिळणारा आर्थिक लाभ पुढे ढकलला जाऊ शकतो. आजचा दिवस आपल्या संयमाची परीक्षा असेल.


वृषभ- आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. अनेक काळापासून असणारे गैरसमज दूर होतील. खर्चावर आळा घाला.


मिथुन- प्रवास करणं टाळा. त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वेळेचं नियोजन फायद्याचं आणि महत्त्वाचं ठरेल.


कर्क- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी व्यत्यय येतील. आजचा दिवस तणावपूर्ण असेल. स्वत:वर रागवाल.


सिंह- अडकलेली काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी आनंदवार्ता मिळेल. नकारात्मक विचार त्रासदायक ठरतील.


कन्या- कामाचा ताण आल्यानं आपला संताप होईल. जोडीदार तुमच्या वागण्यामुळे निराश होईल. शक्य तितक्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.


तुळ- प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्यांपासून दूर राहा. दिवसाअखेरीस चांगला फायदा होईल. आजचा दिवस आपला खराब होणार नाही याची काळजी घ्या. अफवांपासून दूर राहा


वृश्चिक- आपल्याा प्रयत्नांना आज यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. प्रेम प्रकरणांमध्ये आज विचारपूर्व पाऊल उचला. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.


धनु- निरोगी राहण्यासाठी जास्त खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करा.थंड डोक्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा


मकर - जास्त खर्च आणि हुशार आर्थिक योजना टाळा.आज आपला विश्वासघात होऊ शकतो. आजचा दिवस फारसा लाभदायी नाही.


कुंभ- जी स्वप्न सत्यात उतरू शकतात अशा स्वप्नांसाठी विचार करू कार्य करा. कोणाबरोबर आर्थिक व्यवहार करीत आहात याबद्दल सावधगिरी बाळगा.