

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.


वृषभ- काही घटनांमुळे आपल्या समस्या उद्भवू शकतात, ज्या टाळणे शक्य नाही. स्वत: ला शांत ठेवा आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्वरित प्रतिक्रिया देऊ नका.


सिंह- आर्थिक स्थिती आपल्या ताणचं कारण असू शकते. समस्यांवर तोडगा काढण्याची तातडीनं गरज आहे. स्वत:साठी वेळ द्या.


कन्या- अस्वस्थतेची भावना तुम्हाला त्रास देईल. सकारात्मक विचार करा. प्रिय व्यक्तीचा मूड चांगला नसेल.


तुळ- गोष्ट विकत घेण्याआधी त्याचा वापर किती आहे हे पाहाणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.


वृश्चिक- गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दुसर्या दिवसासाठी सोडले पाहिजेत. आपल्या प्रतिष्ठेला इजा पोहोचवू शकेल अशा लोकांशी संपर्क साधू नका.