रातोरात स्टार झालेल्या राणू मंडलच्या नशीबाचं चक्र फिरलं; पुन्हा जुनं आयुष्य जगण्याची वेळ
काही क्षणांतच मिळालेली लोकप्रियता आणि यश राणू मंडलसाठी (ranu mondal) क्षणिकच ठरलं.
|
1/ 8
पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन रातोरात व्हायरल झालेली राणू मंडल आता काय करतेय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या गाण्यामुळे ती अचानक लाइमलाइटमध्ये आली होती.
2/ 8
हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडलला संधी दिली आणि राणू मंडलनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली.
3/ 8
सलमान खानने राणूचे गाणं ऐकल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर राणू अधिक चर्चेत आली होती.
4/ 8
मात्र ही लोकप्रियता आणि यश हे राणूसाठी क्षणिकच ठरलं.रातोरात स्टार बनणाऱ्या राणूमध्ये अहंकार निर्माण झाला होता. तिच्या चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचं देखील समोर आलं होतं. यामुळे हळूहळू तिची प्रसिद्धी कमी होत गेली.
5/ 8
राणूच्या या वर्तनाबाबत स्वत: हिमेशने देखील नाराजी व्यक्त केली होती. राणूच्या जवळच्या व्यक्तीकरवी त्याने तिला चाहत्यांची माफी मागायला सांगितली होती. पण तिनं ते केलं नाही.
6/ 8
गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी राणू मंडलला एका टीव्ही चॅनेलच्या प्रोग्राममध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं. या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन देखील सहभागी होणार होते. पण चाहत्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे राणूचे नाव या यादीतून काढण्यात आलं होतं.
7/ 8
लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करताना राणू मंडलचे फोटो समोर आले होते. पण हा लॉकडाऊन एवढ्या काळासाठी चालेल याचा अंदाज राणूला देखील नव्हता. आता राणू देखील चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे. लॉकडाऊनच्या काळात एक वेळेचं जेवण मिळणंही राणू मंडलसाठी कठीण झालं आहे.
8/ 8
लॉकडाऊन सुरू झाल्यावर राणू मंडल तिच्या आधीच्या आयुष्यात परतली आहे. ती आपल्या जुन्या घरात राहत आहे. जे स्टेशन तिनं सोडलं होतं, आज त्याच स्टेशनवर आपलं पोट भरण्यासाठी ती पुन्हा परतली आहे.