सोयरा तारजी यांनी सीरियामध्ये वेस्टन अॅन्ड मॉडर्न व्डॅल्यूज विषयांमध्ये शिक्षण घेतलेले होतं. त्यामुळेच त्याचा परिणाम त्यांच्या विचारांवर होता. अमानुल्लाह यांचे वडील हाबिबुल्लाह खान ऑक्टोबर 1901 मध्ये अफगाणिस्तानचे राजा झाल्यानंतर त्यांनी अफगाण निर्वासितांना पुन्हा आपल्या राष्ट्रांमध्ये बोलावलं. यावेळी तारजी यांच कुटुंब देखील अफगाणिस्तानमध्ये परत आलं.
त्या दोघांना चार मुलं आणि सहा मुली झाल्या. त्यांच्या एका मुलीचं नाव प्रिसेंज इंडिया असं होतं. प्रिसेंज इंडिया यांनी 2014मध्ये इंटरव्यू मध्ये आपल्या आईच्या विचारांचं कौतुक केलं. सोयरा तारजी यांनी अफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये आपल्या दोन मुलींना शिक्षणासाठी पाठवून समाजामध्ये एक उदाहरण सेट केलं.
त्यांच्या काळामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं गेलं. अमानुल्लाह यांनी आपल्या भाषणामध्ये इस्लाममध्ये कोणत्याही पडदा प्रथेला मान्यता नाही असं म्हटलं होतं आणि याच वेळी भाषण संपताना राणी सोयरा यांनी सार्वजनिक ठिकाणी आपला बुरखा फाडला होता आणि त्याचं अनुकरण तिथे उपस्थित असलेल्या महिलांनीही केलं होतं.