

सध्या वाढतं वजन हा अनेकांच्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. अनियमित खाणं, जंक फूडचा आहारात सर्वाधिक वापर आणि ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम केल्यामुळे अनेकांचं वजन झपाट्याने वाढत आहे.


वाढतं वजन कमी करण्यासाठी लोक जीम, योग, डाएट अशा गोष्टींचा आधार घेतात. कितीही उपाय केले तर मनाप्रमाणे वजन कमी होत नाही. अशात जर तुम्हाला कमी वेळेत वजन कमी करायचं असेल तर आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत.


आता तुम्ही म्हणाल की, व्यायाम आणि योगासनं करूनही वजन जर कमी होत नसेल तर कॉफीने कसं काय होणार? ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे त्यांनी कॉफीत जेवणात वापरणारं खोबरेल तेल घाला. असं केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि पर्यायाने वजनही कमी होतं.


कॉफीत खोबरेल तेल टाकल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न व्हायला लागते. ही कॉफी तयार करण्यासाठी तुम्हाला कॉफीच्या कपात दोन चमचे खोबऱ्याचं तेल घालायचं आहे. यानंतर आधीच तयार करून ठेवलेली दुधाशिवायची कॉफी कपात घाला.


कॉफी गरम असणं अत्यंत गरजेच आहे. त्यामुळे कॉफी आणि तेल चांगल्याप्रकारे एकत्रित होतील. जर तुम्हाला मधुमेहाचा आजार आहे तर साखरेशिवाय तयार केलेली कॉफी प्या.


एका संशोधनात सिद्ध झालं आहे की, दररोज ब्लॅक कॉफीमध्ये खोबऱ्याचं तेल घालून प्यायलं तर वजन कमी होतं आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. याशिवाय पचनक्रियेतही सुधार होतो. ज्यामुळे वजन लवकर कमी होतं.