

कोरोना लशीची प्रतीक्षा संपली, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो अखेर जवळ आला. किंबहुना त्या क्षणाचा निम्मा प्रवासही झाला. आज देशभरात पुण्याहून कोव्हिशिल्ड कोरोना लस पाठवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - ANI)


16 जानेवारीला कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं देशभरात कोरोना लशीची पहिली खेप पाठवली आहे.(फोटो सौजन्य - ANI)


पुण्यातील हे सीरम इन्स्टिट्यूट इथंच ही लस उत्पादित करण्यात आली आहे. ऑक्सफोर्ड युनव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं ही लस तयार करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य - ANI)


लस मिळणार याचा आनंद जितका सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, तितकाच आनंद लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटलाही झाला. लशीचे डोस देशात पाठवताच त्यांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.(फोटो सौजन्य - ANI)


आतापर्यंत तुम्ही सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस तयार झाल्याचं ऐकलं, वाचलं पण आता जिथं ही लस तयार झाली त्या जागेच फोटो समोर आले आहेत. इथंच कोव्हिशिल्ड लस तयार झाली आहे.(फोटो सौजन्य - ANI)


सरकारनं सीरम इन्स्टिट्यूटकडून 1 कोटी 10 लाख लशीचे डोस मागवले आहेत. एप्रिलपर्यंत 5.60 कोटी डोस खरेदी करण्याची योजना आहे.(फोटो सौजन्य - ANI)


पुण्याहून 13 शहरांमध्ये 56.5 लाख डोस हवाई मार्गाने पाठवण्यात आले. यामध्ये दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलॉंग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखऊन आणि चंदीगड या शहरांचा समावेश आहे. कोरोना लशीच्या साठवणुकीसाठी कोलकाता, कर्नाल, चेन्नई आणि मुंबईत चार मोठे स्टोअर उभारण्यात आले आहे. याशिवाय इतर राज्यातही लशीच्या साठवणुकीची सोय करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य - ANI)