सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला ताणतणावानं ग्रासलं आहे. प्रत्येकाच्या ताणाची कारणं वेगवेगळी आहेत. मात्र या ताणाचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. हा ताण जास्त वाढल्यास तो धोकादायक ठरू शकतो. या ताणाशी लढण्यासाठी आणि थोडा आराम मिळण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे मसाज.