प्रेग्नन्सीनंतरही तुम्ही दिसाल स्लीम ट्रिम, 'हे' खाल्ल्यानंतर कमी होईल वाढलेलं वजन
गरोदरपणानंतर (pregnancy) वाढलेलं वजन (weight) कमी करण्यासाठी महिला प्रयत्न करत असतात. यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातच यावर उपाय आहे.
जिरं –जिऱ्याचं उकळलेलं पाणी प्या किंवा दुधात जिरं पावडर मिसळून प्या. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने असिडीटीची समस्याही दूर होईल.
2/ 6
ओवा – पाण्यात ओवा टाकून उकळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. शिवाय चपातीच्या पिठातही ओवा टाकून तुम्ही खाऊ शकता.
3/ 6
मेथी दाणा – एक चमचा मेथीचे दाणे ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी सकाळी प्या. मेथी दाणे टाकून उकळलेलं पाणी तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंचनंतरही पिऊ शकता. प्रेग्नन्सीनंतर उद्भवणारी सांधेदुखीची समस्याही मेथीच्या सेवनाने दूर होते.
4/ 6
बडीशेप – बडीशेप टाकून उकळलेलं पाणी प्या. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर कच्ची बडीशेप चावून खाऊ शकता.
5/ 6
हळद – शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याव्यतिरिक्त वजन घटवण्यातही हळद फायदेशीर आहे. दूध किंवा पाण्यात मिसळून तुम्ही हळदीचं सेवन करू शकता.
6/ 6
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.