Pregnancy Tips : शरीरातील हे बदल सांगतात, तुम्ही सहज आई होऊ शकता की नाही
महिलांच्या आयुष्यात आई होण्यासारखा एक सुंदर अनुभव असतो. आपण सहज आई होऊ शकतो का, हे तुमचे शरीराचं काही संकेतांद्वारे तुम्हाला सांगत असते. पाहुयात ते काय आहेत.
आपले शरीर आई होण्यासाठी तयार आहे किंवा सक्षम आहे. हे काही गोष्टींद्वारे आपल्याला कळू शकते. आपल्या शरीरात काही अशा क्रिया घडत असतात, ज्या सांगतात की आई होण्यासाठी आपले शरीर सक्षम आहे आणि आपण सहज आई होऊ शकतो.
2/ 6
20 ते 25 वर्षे वय - 20-24 वर्षे वयोगटातील कोणत्याही महिलेमध्ये प्रजनन क्षमता सर्वोत्तम असते, हे जगभरातील आतापर्यंत झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे. मात्र प्रजननक्षमतेची वयोमर्यादा स्त्रियानुसार सर्वांसाठी सारखीच नसते.
3/ 6
रेगुलर पिरीएड्स - ज्या स्त्रियांची पीरियड सायकल रेग्युलर असेल. म्हणजेच ज्यांची मासिक पाळी दर महिन्याला वेळेवर येत असेल त्यांची प्रजनन क्षमता चांगली असल्याचे हे लक्षण आहे. याउलट ज्यांचे पिरीएड्स वेळेवर येत नाही त्यांना गर्भधारणेत अडचण येण्याची शक्यता असते.
4/ 6
जीन्सचा संबंध - प्रेग्नन्सीचा विषय निघाला की अनेकांकडून तुम्हाला यातील अडचणी आणि सहजतेबद्दल मिळते. मात्र कौटुंबिक इतिहासाच्या आधारे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेचा अंदाज बांधणे तसे कठीण असते.
5/ 6
योनि स्राव - मासिक पाळीव्यतिरिक्त कधीतरी योनीतून स्पष्ट, गंधहीन स्त्राव येत असेल. तर याचा अर्थ असा होतो की तुमची गर्भाशय ग्रीवा शुक्राणूंना हलवण्यास आणि सहजपणे रोपण करण्यास मदत करते. हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी महत्वाचे असते.
6/ 6
प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम - मूड बदलणे, वारंवार खाण्याची इच्छा होणे, ओटीपोटात दुखणे, थकवा, चिडचिडेपणा, नैराश्य हे मासिक पाळीपूर्व सिंड्रोम म्हणजेच पीएमएसची लक्षणे आहेत. याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र हे चांगल्या प्रजननक्षमतेचे लक्षण आहे.