स्मार्टफोनवरच कोरोनाचं निदान; फक्त 30 मिनिटांत रिपोर्ट हातात
भारतीय शास्त्रज्ञाने अमेरिकेतील शास्त्रज्ञांसह मिळून नवीन पोर्टेबल कोरोना टेस्ट (corona test) विकसित केली आहे. रॅपिड टेस्ट कुठेही सहजपणे वापरता येऊ शकते.
|
1/ 6
सध्या कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे की नाही याचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. ज्यासाठी संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेतले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात आणि त्याचा रिपोर्ट यायलाही खूप वेळ लागतो.
2/ 6
मात्र आता अमेरिकेतील भारतीय शास्त्रज्ञाने आपल्या टीमसह मिळून एक पोर्टेबल रॅपिड कोरोना टेस्ट तयार केली आहे. जी कुठेही आणि कुणालाही करता येईल, अशी सहजसोपी टेस्ट आहे.
3/ 6
कोरोनाच्या या रॅपिड टेस्टचं नाव आहे एलएएमपी (LAMP). पीएनएएस जर्नलध्ये ( PNAS journal) या टेस्टबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - PNAS)
4/ 6
या टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ते तपासणीसाठी कोणत्याही लॅबमध्ये पाठवण्याची गरज नाही आणि फक्त फक्त 30 मिनिटांत रिपोर्ट स्मार्टफोनवर मिळू शकतो. शिवाय आरटी-पीसीआर टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या तापमानाचीही गरज नाही. एकच विशिष्ट तापमान लागतं. ((फोटो सौजन्य - PNAS)
5/ 6
अमेरिकेतल्या इलिनोइस युनिव्हर्सिटीतील बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक राशिर बशीर म्हणाले, या उपकरणाला आणि टेस्टला परवानगी दिली तर अनेक सार्वजनिक ठिकाणांसह घरच्या घरीही स्वत:ची कोरोना टेस्ट करू शकतो.
6/ 6
सर्वच बाबतीत एलएएमपी टेस्ट आरटी-पीसीआर टेस्टेपक्षा जास्त प्रभावी आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.