ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (pope francis) सध्या एका बिकनी मॉडेलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
|
1/ 6
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस जगभर प्रसिद्ध आहेतच मात्र सध्या ते चर्चेत आहेत ते एका बिकनी मॉडेलमुळे. बिकनी मॉडेलच्या हॉट फोटोवर पोप फ्रान्सिस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे.
2/ 6
पोप फ्रान्सिस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो लाइक केला. ही मॉडेल म्हणजे नतालिया गॅरीबोटा आहे.
3/ 6
नतालियाच्या फोटोंना बरेच लाइक असतात, असाच तिचा एक फोटो म्हणजे ज्यात ती स्कूल युनिफॉर्म घालून लॉकरमध्ये पुस्तकं ठेवताना दिसते आहे.
4/ 6
नतालियाचा हा फोटो पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत अकाऊंटवरून लाइक करण्यात आला. ज्यामुळे नतालियाच्या फोटोपेक्षा पोप फ्रान्सिस यांची आणि त्यांच्या कमेंटची चर्चा होऊ लागली. एखाद्या धर्मगुरूनं असे फोटो लाइक केल्यानं सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
5/ 6
टीका होताच पोप फ्रान्सिस यांच्या अकाऊंटवरून हा फोटो आणि त्यावरील लाइक आता हटवण्यात आले आहेत. मात्र त्याचे स्क्रिनशॉट अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
6/ 6
पोप फ्रान्सिस यांनी आपला फोटो लाइक करतातच या मॉडेलनंही त्यावर प्रतिक्रया दिली आहे. आपल्याला आता स्वर्गाची प्राप्ती होणार असं तिनं म्हटलं. आपण आता वेटिकन सिटीला जाणार असल्याचंही ती म्हणाली.