

21 वर्षांची असलेली याना इव्हानोवा पोलंडमध्ये राहते. एकेकाळी 73.5 किलो वजन असलेली याना आज देशातील टॉप मॉडेल आहे. तब्बल 25 किलो वजन तिनं घटवलं. तिचे फोटो पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही की तिचं वजन सत्तरपेक्षा अधिक होते. (फोटो सौजन्य - yana_ivanovaa/इन्स्टाग्राम)


यानाला एक दिवस जाणवलं की वजनामुळे ती आपल्या क्षमतांचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये अडथळे येत आहेत. म्हणूनच तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य - yana_ivanovaa/इन्स्टाग्राम)


यानाने आपला आहार बदलून आणि रोज व्यायाम करून एकूण 25 किलोंहून अधिक वजन कमी केलं आहे आणि आता ती एक मॉडेल आणि ब्युटीक्वीन म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य - yana_ivanovaa/इन्स्टाग्राम)


याना सांगते, मी लहानपणापासूनच सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. जरी नंतर ते स्वप्न विसरले असले तरी तरुण झाल्यानंतर फिट होण्याच्या क्रेझनं तिनं आपलं ध्येय साध्य केलं. मॉडलिंगमध्ये ती मिस युक्रेनची फायनलिस्ट ठरली. (फोटो सौजन्य - yana_ivanovaa/इन्स्टाग्राम)


FEMALE या मासिकाची बोलताना याना म्हणाली, "लहान असल्यापासूनच मला सौंदर्य स्पर्धा पहाण्यात आवड होती. जेव्हा माझं वजन कमी झालं तेव्हा मला मॉडेलिंग एजन्सीकडून इन्स्टाग्रामवर कास्टिंग कॉलमध्ये भाग घेण्याची ऑफर आली तिथं मी काम करण्यास सुरुवात केली आणि आता जसजशी मी पुढे जात आहे मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मिळत आहे आणि माझा आत्मविश्वास सुद्धा वाढत आहे" (फोटो सौजन्य - yana_ivanovaa/इन्स्टाग्राम)